स्थानिक

बारामती नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रत्येक नागरिकाची होणार आरोग्य तपासणी.

आज पासून आरोग्य तपासणीस सुरुवात.

बारामती नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रत्येक नागरिकाची होणार आरोग्य तपासणी.

आज पासून आरोग्य तपासणीस सुरुवात.

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील प्रत्येक नागरिकाची आजपासून आरोग्य तपासणी होणार आहे.

बारामती नगरपालिकेच्या 19 प्रभाग मधील सर्व नागरिकांची आजपासूनच आरोग्य तपासणी करण्यात येणार असून कोरोना सोबतच इतर साथीचे आजार, किटकजन्य रोग व चिकूनगुनिया, डेंगी यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने शहरातील सर्व नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण करण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे.​

बारामती शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव विचारात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक बारामतीकर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय बारामती नगरपालिकेने घेतला आहे.         मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी या बाबत माहिती दिली.

YouTube player

बारामती नगरपालिकेच्या 19 प्रभागातील सर्व नागरिकांची आजपासूनच आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. कोरोना सोबतच इतर साथजन्य आजार, किटकजन्य रोग व चिकूनगुनिया, डेंगू यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शहरातील सर्व नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण करण्याचे काम आजपासून सुरु होणार आहे.

प्रत्येक प्रभागासाठी आशा स्वयंसेविका व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांची टीम हे काम करणार आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. मृत्यूदरही वाढलेला असल्याने आता तोही आटोक्यात ठेवण्याचे आव्हान आहे.

प्रत्येक प्रभागात संबंधित नगरसेवक या मोहिमेचे समन्वय नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने करणार आहेत.

या पथकामध्ये असलेल्या आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी मास स्क्रिनिंगमध्ये थर्मल स्कॅनिंग व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करुन नोंदी घेणार आहेत. 

दुसरीकडे प्रत्येक प्रभागामध्ये बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डेंगी होऊ नये या साठी धूरफवारणी करणार आहे. या बाबतचे सविस्तर नियोजन बारामती नगरपालिकेने केले असून आजपासूनच या तपासणीस प्रारंभ होईल. या नोंदीचा अहवाल उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत नाझिरकर यांच्याकडे देण्यात येणार आहे. सर्वेक्षणामध्ये संशयित वाटणाऱ्या नागरिकांची तातडीने पुढील तपासणी केली जाणार आहे. बारामतीकरांनी या पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!