स्थानिक

बारामती नगरपरिषदेच्या विषय समित्यांची बिनविरोध निवड

बारामती नगरपरिषदेच्या विषय समित्यांची बिनविरोध निवड ; काळे, सातव, भोकरे, बागवान, माने यांची सभापतीपदी निवड

बारामती नगरपरिषदेच्या विषय समित्यांची बिनविरोध निवड

बारामती नगरपरिषदेच्या विषय समित्यांची बिनविरोध निवड ; काळे, सातव, भोकरे, बागवान, माने यांची सभापतीपदी निवड.

बारामती वार्तापत्र

बारामती नगर परिषदेच्या आज निवड करण्यात आली या निवडी पुढील प्रमाणे बारामती नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडि बिनविरोध झाल्या.स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सुरज दत्तात्रय सातव, पाणी पुरवठा व जल:निस्सारण समितीच्या सभापतीपदी रमेश अण्णा भोकरे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सत्यव्रत अर्जुनराव काळे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या बेबीअरम अजिज बागवान यांची, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी आशा दत्तू माने यांची,तर उपसभापतीपदी ज्योती भारत सरोदे यांची निवड करण्यात आली.

स्थायी समितीच्या सदस्यपदी किरण गुजर,सचिन सातव, कमल कोकरे यांची निवड करण्यात आली. दरम्यान सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते सचिन सातव यांनी पिठासन अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील यांच्या कडे नामनिर्देशन अर्जांची यादी सादर केली. तर विरोधी गटाच्या वतीने विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी यादी सादर केली. सभापती व सदस्यांची यादी जाहीर केली.यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.सहाय्यक पिठासन अधिकारी म्हणून किरणराज यादव यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!