
बारामती नगरपरिषद च्या मुध्यधिकारी पदी किरणराज यादव.
योगेश कडूस्कर यांची तातडीने बदली.
बारामती:वार्तापत्र
बारामती : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुस्कर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त किरणराज यादव यांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे.अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बारामती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार यादव यांनी तातडीने स्वीकारावा अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
योगेश कडुस्कर यांची बदली होणार अशा प्रकारचे संकेत गेल्या अनेक दिवसांपासून मिळत होते. अखेर काल त्यांची बदली करण्यात आली. आता बारामती नगरपालिकेची विकासकामे वेगाने पुढे नेण्याचे आव्हान किरणराज यादव यांच्यासमोर असेल.
या आधी बारामती नगर परिषदेला ‘अ’ दर्जा नव्हता त्यावेळी किरणराज यादव यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते.. बारामती नगरपरिषदेची आता हद्दवाढ झाली असून बारामती नगर परिषदेला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेली बारामती नगरपरिषद एकमेव आहे.
अजित पवार यांचे लक्ष
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा मतदारसंघ असल्याने बारामती नगर परिषदेवर त्यांचे वैयक्तिक लक्ष असते. आपल्या कामाच्या गतीबरोबर काम करणारे अधिकारी अजित पवार बारामतीमध्ये नेमतात असा आधीपासूनचा पायंडा आहे.
अजित पवार यांच्या कार्यपद्धतीनुसार आता किरण राज यादव यांना बारामतीच्या विकास कामांन गती द्यावी लागणार आहे. नगरसेवकांचे गट गट आणि स्थानिक राजकारण यांचा सामना करत असतानाच दुसरीकडे विकासकामांना वेगाने मार्गी लावण्याचे काम यादव यांना करावे लागेल. बारामतीमध्ये पूर्वी काम केलेले राहुल काळभोर यांना नुकतेच पुन्हा गटविकास अधिकारी पदी नेमण्यात आले आहे. दुसरीकडे मुख्याधिकारी म्हणून पूर्वी काम केलेल्या किरणराज यादव यांना परत एकदा बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.