बारामती नगरपरिषद व टीना सराफ यांच्या माध्यमातून शाळा क्रमांक ८ परिसरात वृक्षारोपण
रेड चाफा, ,ग्रीन चाफा,रेन ट्री,बहावा, चेरी या जातीची झाडे

बारामती नगरपरिषद व टीना सराफ यांच्या माध्यमातून शाळा क्रमांक ८ परिसरात वृक्षारोपण
रेड चाफा, ,ग्रीन चाफा,रेन ट्री,बहावा, चेरी या जातीची झाडे
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद उद्यान विभाग व टीना रोहित सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 8 वसंत नगर येथे 52 झाडे लावण्यात आली यामध्ये रेड चाफा, ,ग्रीन चाफा,रेन ट्री,बहावा, चेरी या जातीची झाडे शालेय परिसरात लावण्यात आली व ती झाडे जगवण्याची पूर्ण जबाबदारी यांच्या टीमने घेतली आहे.ग्लोबल वॉर्मिंग चा धोका टाळायचा असेल तर वृक्ष वाढ झाली पाहिजे व ते सर्व समाज हिताचे होईल असे यावेळी टीना सराफ मॅडम यांनी सांगितले.
याप्रसंगी उद्यान विभागाचे प्रमुख विजय शितोळे,पठाण साहेब व टीना सराफ ग्रुपच्या फरीदा भोरी, प्रियंका मुथा,डॉक्टर शीतल मेहता, शिखा,तृप्ती, संजना तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला शेंडे मॅडम, निळकंठ कापसे सर, शुभदा कुलकर्णी मॅडम, वर्षा साळवे मॅडम,श्री विकास कंकाळ सर, पुनम कांबळे मॅडम, बापू नरुटे सर इत्यादी उपस्थित होते शालेय परिसरात झाडे लावल्यामुळे शाळेची शोभा वाढेल तसेच या सर्व टीमचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेंडे मॅडम यांनी मानले.
त्यानंतर श्री प्रदीप भोसले सर अध्यक्ष रुरल रिलेशन पुणे यांच्याकडून शाळेला लायब्ररी भेट देण्यात आली यामुळे शाळेच्या पटसंख्येत सुद्धा यावर्षी चांगली वाढ झाली आहे असे मुख्याध्यापिका सौ.शेंडे मॅडम यांनी यावेळी सांगितले.