बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 8 वसंतनगर येथे इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दिमाखात साजरा
वही,व मुलांना खाऊ यांचे वाटप यावेळी करण्यात आले.

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 8 वसंतनगर येथे इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दिमाखात साजरा
वही,व मुलांना खाऊ यांचे वाटप यावेळी करण्यात आले.
बारामती वार्तापत्र,
दिनांक 15/06/2022,वार – बुधवार शाळेचा पहिला दिवस यानिमित्ताने इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव बारामती नगर परिषद शाळा क्रमांक 8 येथे येथे आयोजित केला होता आज इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला या निमित्ताने त्यांचे शाळेत वाजत गाजत तसेच गुलाब फुले फुगे देऊन स्वागत करण्यात आले.
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी बारामती शहरातील प्रसिद्ध उद्योजक माननीय संदीपजी आहेर सर व त्यांच्या पत्नी पल्लवी आहेर मॅडम तसेच बसाडे सर माजी उपमुख्याध्यापक शहाजी हायस्कूल सुपा,ललवाणी साहेब प्रसिद्ध कापड उद्योगपती ,बारामती,पिया लव्हे मॅडम सामाजिक कार्यकर्त्या बारामती, यांनी मिळून सर्व विद्यार्थ्यांना सिंगल लाईन वही, डबल लाईन वही, स्क्वेअर लाईन वही, प्रयोग वही, चित्रकला वही,व मुलांना खाऊ यांचे वाटप यावेळी करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मला चंद्रकांत शेंडे मॅडम,श्री.निळकंठ कापसे सर,सौ.शुभदा नितीन कुलकर्णी मॅडम,सौ.वर्षा सत्यवान साळवे,श्री. विकास विलास कंकाळ सर,सौ.पूनम अर्जुन पाळेकर व श्री. बापू शिवाजी नरुटे सर उपस्थित होते.