बारामती नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी धारकांना माजी विरोधी पक्ष नेत्यांचे जाहीर आवाहन
अशा प्रकारे प्रशासकीय कालावधीमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रशासकास अधिकार नाही.

बारामती नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी धारकांना माजी विरोधी पक्ष नेत्यांचे जाहीर आवाहन
अशा प्रकारे प्रशासकीय कालावधीमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रशासकास अधिकार नाही.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद हद्दीतील मिळकत धारकांना चालू वर्षाच्या आर्थिक घरपट्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने शास्ती आकारणी केली आहे तसेच चालू वर्षाची आकारणी ज्याची एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 रोजी मुदत संपत आहे,अशा मिळकत धारकांना बारामती नगरपालिकेने दोन टक्के दरमहाप्रमाणे शासकीय आकारणी चुकीच्या पद्धतीने केले आहे.
अजून बऱ्याच भागात बिले देणे बाकी आहेत.आपल्या जवळच असलेले दौंड,इंदापूर,फलटण,पुरंदर, जेजुरी, सासवड या नगरपालिकांनी अशा प्रकारे कोणतीही शास्तीची आकारणी केलेली नाही, अशा प्रकारे प्रशासकीय कालावधीमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रशासकास अधिकार नाही, या बाबींचा विचार करून पालिकेने नेमलेल्या स्थापत्य
कन्सलटन्सी अमरावती या एजन्सीला आदेश करून त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करून ज्या मिळकत धारकांनी दबावापोटी शास्ती भरलेली आहे ती शास्ती पुढील आर्थिक वर्षात जमा करून घेणे आणि ज्यांची घरपट्टी भरणे बाकी आहे अशा नागरिकांना आपण चालू वर्षाच्या शास्तीची सूट द्यावी,शास्ती म्हणजेच दंड लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार प्रशासकास नाही तरी घरपट्टी धारकांनी शास्ती भरू नये,असे आवाहन बारामती नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी केले आहे.