बारामती नगरपालिका आता प्लास्टिक कचरा घेणार विकत
संपर्क साधावा-8600700461
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेने आता प्लास्टिक कचरा विकत घेण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्याकडे प्लास्टिक कचरा असेल त्यांनी पालिकेला कचरा द्यावा असे आव्हान बारामती नगरपालिकेने केले आहे.
प्लास्टिक व्यवस्थापनाकरिता LUCRO यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक संकलन व पुनर्प्रक्रिया या उपक्रमांतर्गत, बारामती शहरातील सोसायट्यांना भेटी देऊन नोंदणी सुरू केली आहे.
या सोसायटीकडून जमा झालेले प्लास्टिक LUCRO यांच्यामार्फत संकलित करून त्यांना त्याचे मूल्य अदा केले जाणार असल्याचे नगरपरिषद कडून सांगण्यात आले आहे.
बारामती शहरातील सोसायट्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याकरिता सचिन झुंज mob: 8600700461
यांचेशी संपर्क साधावा