बारामती नगर परिषदेच्या आंदोलनाची धग कायम
कर्मचाऱ्यांनी केली तीव्र निदर्शने
बारामती वार्तापत्र
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये सालाबाद प्रमाणे मिळणारे सानुग्रह अनुदान विस हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करावे या मागणीसाठी बारामती नगर परिषदेच्या सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना सानुग्रह अनुदान विषयी निवेदन दिले होते. त्यावेळी नगराध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान विषयी सकारात्मक असल्याचे सांगितले होते मात्र ऐन वेळी आर्थिक अडचणीमुळे काहीतरी मार्ग काढू असे सांगितल्यामुळे काल नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून नगर परिषदेच्या प्रांगणात आंदोलन केले होते मात्र आजही त्यावर योग्य तोडगा न निघाल्याने या आंदोलनाची धग कायम असल्याचे दिसत आहे.
लॉकडाउनच्या कालावधीत कोरोणाची तीव्रता बारामती मध्ये वाढलेली असताना ज्या कर्मचाऱ्यांनी आपले तन मन धन लावून योगदान दिले. कर्मचारी वेगवेगळ्या मार्गाने यावर नगरपरिषदेस तोडगा सुचवत आहेत परंतु त्याविषयीही कोणतेही पाऊल नगरपरिषदेच्या वतीने उचलले गेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आज ही वेळ आल्याने शहरातील नागरिकही याविषयी उलट-सुलट चर्चा करू लागले आहेत.
सत्ताधारी नगरसेवकांनी दिला पाठींबा
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनासाठी सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला त्यामुळे एकीकडे अध्यक्षांनी आर्थिक अडचणीची मांडलेली भूमिका व त्याच्या परस्पर विरोधी सत्ताधारी नगरसेवकांनि आंदोलनास दिलेला पाठिंबा यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजातील वातावरण ढवळून निघाले आहे.
बारामती वार्तापत्र चे कर्मचाऱ्यांनी केले कौतुक
बारामती वार्तापत्र ने काल आंदोलनाविषयी दिलेल्या बातमीपत्रात कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या सणासुदीत नगरपालिकेच्या दारासमोर बसावे लागणार अशा आशयाची बातमी दिली होती ती आजच्या प्रकारामुळे खरी ठरली असून आजही कामगारांचा प्रश्न कायम असून त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही त्याचबरोबर दिलेल्या बातमीमध्ये झारीतील शुक्राचार्य कोण याविषयी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आजच्या आंदोलनात त्या शुक्राचार्यांचा तीव्र निषेध नोंदवला
सह्यांची मोहीम राबवण्याचे कारण काय?
नगरपरिषदेच्या आंदोलनाचा तिढा हा आणखीनच पडत चालल्याचे दिसत आहे आज आंदोलकांनी नगरपरिषदेच्या काम बंद आंदोलनासाठी सह्यांची मोहीम राबवली यावरूनच हे आंदोलन आणखी चिघळणार कि काय याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादां पर्यंत आंदोलकांचा मॅसेज पोहोचला का?
कालच्या सानुग्रह अनुदान विषयीच्या मागणीसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी आंदोलक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटणार होते परंतु अजितदादा पर्यंत सदरचे निवेदन पोहोचले की नाही याविषयी अजून ठोस माहिती मिळाली नाही
त्यामुळे एकूणच दिवाळीचा सण सुरू झालेला असताना या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सानुग्रह अनुदाना विषयी अजूनही टांगती तलवार असल्याचे प्राप्त परिस्थिती वरून दिसत आहे.