भिगवण व वालचंदनगर येथे तिघांकडून २ गावठी पिस्टल, ३ काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा सुमारे ७ लाखाचा माल जप्त
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे पथकाची कामगिरी

भिगवण व वालचंदनगर येथे तिघांकडून २ गावठी पिस्टल, ३ काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा सुमारे ७ लाखाचा माल जप्त
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे पथकाची कामगिरी
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.२० ) रोजी मिळालेल्या बातमीवरून भिगवण व वालचंदनगर येथुन तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा एकूण किंमत ७ लाख ५० हजार ३०० रुपयांचा माल जप्त केलेला आहे. तीन आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेविरुद्ध भिगवण व वालचंदनगर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
मंगळवारी १०.३० वा. च्या सुमारास मौजे भिगवण गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर रोड लगत,बस स्थानका समोरील उड्डानपुलाच्या खाली गणेश गजानन यादव (वय २६ वर्षे) रा.कळस ता.इंदापूर जि.पुणे याचे ताब्यातून १ गावठी पिस्टल, १ जिवंत काडतुस व स्कार्पिओ जीप असा एकुण ७ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच दुपारी १६.३० वा.चे सुमारास वालचंदनगर जंक्शन चौक, कळस रोड ता.इंदापूर जि.पुणे येथे इसम नामे सचिन बाळू दळवी ( वय २९ वर्षे )रा.वालचंदनगर, रामवाडी ता.इंदापूर जि.पुणे,सुनिल सुदर्शन खरात ( वय ३० वर्षे ) रा.रणगाव , खरातवस्ती ता.इंदापूर जि.पुणे यांचे ताब्यातून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस असा एकुण किं.रु.५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपी सचिन दळवी यांच्यावर सन २०१९ मध्ये ॲट्रॉसिटी व सन २०२० मध्ये गुटखा बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सुनील खरात याच्यावर सन २०१३ मध्ये मारामारी व सन २०१९ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,सपोनि. सचिन काळे,स.फौ. चंद्रकांत झेंडे,पो.ह महेश गायकवाड, पो.ह निलेश कदम,पो.ह सचिन गायकवाड, पो.ह सुभाष राऊत,पो.ह गुरु गायकवाड,पो.ना अभिजित एकाशिंगे,पो.कॉ. अक्षय जावळे
यांनी केलेली आहे.