बारामती पंचायत समितीच्या भव्य चार मजली नूतन इमारतीचे उद्घाटन ,ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आज होणार!
सुमारे सुमारे पावणे बावीस कोटी रुपये खर्च इमारतीसाठी करण्यात आला आहे.
बारामती पंचायत समितीच्या भव्य चार मजली नूतन इमारतीचे उद्घाटन ,ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आज होणार!
सुमारे सुमारे पावणे बावीस कोटी रुपये खर्च इमारतीसाठी करण्यात आला आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील पंचायत समितीच्या नूतन भव्य इमारतीचे वास्तूचे उद्घाटन शनिवारी (ता. १९) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे व उपसभापती रोहित कोकरे यांनी दिली.
या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सभापती प्रमोद काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सदस्य विश्वास देवकाते, भरत खैरे, रोहिणी तावरे, मीनाक्षी तावरे आदी उपस्थित राहणार आहेत.
बारामती पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या जागेवरच तीन मजली भव्य अशी नूतन इमारत उभी करण्यात आली आहे. त्यासाठी
ग्रामीण विकास कार्यक्रम, पंचायतराज व सहायक अनुदानातून निधी उपलब्ध झाला. सुमारे पावणे बावीस कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या वास्तूमध्ये लवकरच पंचायत समितीचे कामकाज सुरु होणार असल्याची माहिती सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे व गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी दिली.
पंचायत समिती नूतन इमारत दृष्टीक्षेत्रात
• एकूण २१ कोटी ७८ लाख रुपये खर्च
• इमारतीचे क्षेत्रफळ ३१०४.९७ चौरस मीटर
• पार्किंगचे क्षेत्रफळ १६३२.२९ चौ.मी.
• पार्किंग अधिक तीन मजले, अशी एकूण चार मजली इमारत.
• सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यांचे सुसज्ज कक्ष
• सहायक गटविकास अधिकारी कक्ष, सुसज्ज सभागृह
• प्रशासन, समाज कल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत विभाग, कृषी विभाग, अर्थ विभाग, कॉन्फरन्स हॉल व स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था
• दुसऱ्या मजल्यावर बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, छोटे पाटबंधारे विभाग, आरोग्य व पशुसंवर्धन विभाग.
• तिसऱ्या मजल्यावर शिक्षण विभागासह एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पासह सुसज्ज सभागृह व पंचायत समिती स्त्री पुरुषांचे स्वतंत्र कक्ष