बारामती पंचायत समिती व पिंपळी अंगणवाडी येथे पुणे विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास संजय माने यांची बारामती दौऱ्या प्रसंगी भेट.
कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
बारामती पंचायत समिती व पिंपळी अंगणवाडी येथे पुणे विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास संजय माने यांची बारामती दौऱ्या प्रसंगी भेट.
कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
बारामती वार्तापत्र
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बारामती -१ व २ पंचायत समिती बारामती कार्यालायास विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास, पुणे विभाग पुणे संजय माने यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांचे स्वागत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन केले.
तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा सह.गटविकास अधिकारी पंचायत समिती अभिमान माने यांनी प्रकल्प बारामती-१ व २ कार्यालयाचा कार्यालयीन कामकाजाचा आढावा दिला. त्याचबरोबर विभागीय उपआयुक्त संजय माने यांनी प्रकल्प बारामती-१ व २ चे सी.डी.पी.ओ. अभिमान माने यांचे उत्कृष्ट कामकाज बाबत विशेष कौतुक व अभिनंदन केले.
त्यानंतर पिंपळी ग्रामपंचायत अंतर्गत पिंपळी गावठाण अंगणवाडी केंद्रास भेट देऊन अंगणवाडी वार्षिक सर्व्हेक्षण , टी.एच.आर. आहार वाटप ,कुपोषित बालके ( एम/ एस यु. डबलिव्ह , एस.ए.एम/ एम.ए.एम ) अंगणवाडी स्वच्छता,अंगणवाडी नियमीत गृहभेटी,अंगणवाडी रंगरंगोटी व बोलक्या भिंती आदी कामकाजाबाबतचा सविस्तर आढावा काटेवाडी बीट पर्यवेक्षिका रत्नप्रभा मदने यांनी दिला पिंपळी लिमटेक गावात एकही मुलगा कुपोषित नसल्याने व अंगणवाडी कामकाज आदर्शवत असे केल्याने पर्यवेक्षिका रत्नप्रभा मदने यांचे व पिंपळी अंगणवाडी सेविका सोनम केसकर व मदतनीस वैशाली माने यांचे त्यांनी विशेष कौतुक केले तसेच अंगणवाडी कामकाजाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आणि अंगणवाडी कामकाज उत्कृष्ट असल्याची नोंद शेरे पुस्तकामध्ये घेण्यात आली.
त्यानंतर शासकीय महिला प्रेरणा वसतिगृहास एम.आय.डी.सी.बारामती येथे भेट देऊन कामकाजची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली व मार्गदर्शन केले. एकूण बारामती विभागातील सर्व कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच बारामती शहर विभागातील सुतारनेट कसबा अंगणवाडी केंद्रास भेट देऊन अंगणवाडी बीट कामकाजाचा आढावा मुख्यसेविका मिलान गिते यांचेकडून घेण्यात आला.व कामकाजामध्ये सुधारणा करणेबाबतचे निर्देश दिलेले आहेत.
या भेटी दरम्यान बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा सह.गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती अभिमान माने लेखाधिकारी(वर्ग-२) महिला व बाल विकास विभाग ,पुणे विभाग पुणे बी.व्ही.जाधव,शासकीय प्रेरणा वसतिगृह,बारामती अधिक्षक संपदा संत,बारामती पंचायत समिती सह.बालप्रकल्प अधिकारी दिपक नवले,बारामती पंचायत समिती विस्तार अधिकारी सांख्यिकी विभागपुनम मराठे बारामती विस्तार अधिकारी सांख्यिकी सोमनाथ लेंगरे, संरक्षण अधिकारी मनिषा जाधव,काटेवाडी बीट पर्यवेक्षिका रत्नप्रभा मदने, बारामती शहर विभाग मुख्यसेविका मिलान गिते,पिंपळी अंगणवाडी सेविका सोनम केसकर, मदतनीस वैशाली माने आदी मान्यवर उपस्थित होते.