बारामती परिसरातील विकासकामे वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
अपूर्ण कामांबाबत संबंधित विभागाने माहिती घेऊन ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा.

बारामती परिसरातील विकासकामे वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
अपूर्ण कामांबाबत संबंधित विभागाने माहिती घेऊन ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा.
बारामती वार्तापत्र
बारामती परिसरातील विकासकामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्या आणि सर्व कामे वेळेत पूर्ण करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करताना दिले.
श्री.पवार यांनी आज कऱ्हा नदी सुशोभिकरण प्रकल्पातंर्गत दशक्रिया विधी घाट, एसटी स्टॅन्डचे नवीन बांधकाम व परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण कामाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. . सर्व विभागांनी विकास कामे समन्वयाने पार पाडावीत. निधीचा योग्य पद्धतीने वापर करावा. निधीची आवश्यकता असल्यास संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावेत. सार्वजनिक कामे चांगली व वेळेत होण अपेक्षित आहेत. अपूर्ण कामांबाबत संबंधित विभागाने माहिती घेऊन ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. शहरातील रस्त्यावरील खड्डे लवकर भरुन घ्यावेत. सर्वच विभागानी जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, गटनेता सचिन सातव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता राहूल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आदी उपस्थित होते.