बारामती पाठोपाठ आता इंदापूर तालुक्यात ही सात दिवसांचा कड़क लॉकडाउन…10 मे मध्यरात्री पासून ते 17 मे पर्यत
आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय...

बारामती पाठोपाठ आता इंदापूर तालुक्यात ही सात दिवसांचा कड़क लॉकडाउन…10 मे मध्यरात्री पासून ते 17 मे पर्यत
आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय…
इंदापुर;बारामती वार्तापत्र
येणाऱ्या 10 मे पासून (सोमवारी) मध्यरात्री पासून ते 17 मे पर्यत कड़क लॉकडाउन..
कोरोना अटोकयात नाही आला तर लॉकडाउन पुढे अधिक वाढविणार..
प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांची माहिती…
फक्त मेडिकल सुविधा सुरु राहणार..
दूध विक्रीसाठी फक्त सकाळी सात ते नउ दुकाने सुरु राहणार..
इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आज दिनांक ८ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना अटोकयात नाही आला तर लॉकडाउन पुढे अधिक वाढविणार.. प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांची माहिती…
फक्त मेडिकल सुविधा सुरु राहणार.. दूध विक्रीसाठी फक्त सकाळी सात ते नउ दुकाने सुरु राहणार..
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे. इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अंकिता शहा,पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे व सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अनिल ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सोमवार दिनांक १० मे च्या मध्यरात्रीपासून सात दिवसासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा (मेडिकल हॉस्पिटल) दूध (सकाळी ९ ते ११) वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
यामुळे शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या निर्णयाचे सर्वसामान्य इंदापूरकरानी स्वागत केले असून कोरोना वर मात करण्यासाठी ज्या काय उपाय योजना केल्या जातील त्याला साथ देण्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केले आहे.