बारामती पोलिसांचं नेमकं चाललंय काय..? एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी
एक लाख 59 हजार रुपये चोरी

बारामती पोलिसांचं नेमकं चाललंय काय..? एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी
एक लाख 59 हजार रुपये चोरी
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत रात्रीत घरफोड्या झाल्या आहेत.शहरातील समर्थनगर येथे एकाच रात्रीत, दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याची घटना घडल्या असुन या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी एक लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर हकीकत अशी की दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री ते 25 डिसेंबर रोजी सकाळी या दरम्यान या दोन्ही घरफोडीच्या घटना घडल्या आहेत, शहरातील समर्थनगर गुणवडी रोड येथील किराणा दुकानाचे तसेच एका एजन्सीच्या दुकानाचे शटर उचकटून घरफोडी केल्या आहेत किराणा दुकानातील काउंटरच्या ड्रोअर मधील रोख दीड लाख रुपये तसेच त्या शेजारील एजन्सीच्या दुकानातील 9000 रुपये अशी एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून साधारण एक लाख 59 हजार रुपये चोरी करून चोरून नेल्याची घटना घडल्या आहेत.
सध्या बारामतीत चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीत चोरीचं प्रमाण वाढलं असल्याचं बोललं जात आहे. चोरांचं प्रमाणही वाढल्याचं चोरीच्या घटनांवरुन स्पष्ट होतं आहे. एकाच रात्रीत एक दोन घरं फोडल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.