बारामती पोलिसांचा धाक राहिलाय की नाही?भिगवण चौकात युवकाला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
डोक्याला, हाताला, उजव्या डोळ्यावर बेदम मारहाण

बारामती पोलिसांचा धाक राहिलाय की नाही?भिगवण चौकात युवकाला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
डोक्याला, हाताला, उजव्या डोळ्यावर बेदम मारहाण
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिगवण चौकात तिघांनी एका युवकाला दगड, हातातील लोखंडी कड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. 09) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
विनोद गणेश जाधव (वय 19, व्यवसाय शिक्षण रा. तांदुळवाडी ढेरे वस्ती, ता. बारामती) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आनंद शाम सुर्यवंशी, विक्रांत गोरख गायकवाड, रुद्र नवनाथ सुर्यवंशी (रा. सर्व नेवसे रोड, चिमन शहा मळा, बारामती) असे मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी विनोद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विनोद जाधव हा युवक भिगवण चौक येथे असताना विक्रांत गायकवाड व रुद्र सुर्यवंशी यांनी गाडी आडवी लावली. दोघांनीही त्याला शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या आनंद सूर्यवंशी याने शेजारी पडलेल्या दगडाने व हातातील कड्याने डोक्याला, हाताला, उजव्या डोळ्यावर बेदम मारहाण केली.
दरम्यान, याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात विनोद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील तिघांवर भारतीय दंड संहिता कलम 118(1), 351(2)(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार टापरे करीत आहेत.