बारामती पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
बेकायदेशिर पिस्टल विक्री करणा-या टोळीला ठोकल्या बेडया
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलीस ठाण्यात एका हॉटेल चालकास काही अनोळखी युवकांनी मारहाण करून जबदस्तीने पैसे चोरून नेहल्याबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयातील आरोपी व त्याचे साथीदार हे पिस्टल विक्री करण्यासाठी रूई पाटी, बारामती येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे व विजय वाघमोडे यांना मिळाली होती.
त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने रूई पाटी, बारामती येथून जबरी चोरीतील आरोपी अदिनाथ इश्वर गिरमे (वय २१ वर्षे,रा पाटस,ता.दौड जि.पुणे) यास त्याबाबत घेवून त्यांची अँक्टीव्हा मोटार सायकल क.एम.एच ४२ ए व्ही ०६८१ ची तपासणी केली असता मोटार सायकलच्या डिकी मध्ये एक पिस्तुल व २ राऊंडस व त्यांचे इतर साथीदार विजय रामदास कराड (वय २० वर्षे रा टेम्बुर्णी, ता. शिरूर, जि.बीड )अमोल रमेश गर्जे (वय २२ वर्षे राहणार पिसाठवाडी,ता.पाधी जि.अहमदनगर ) व इतर दोन युवकांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता आणखी ६ पिस्तुल व ८ राउडस असे एकुण ७ पिस्टल व १० राउडस असे एकुण ( किंमत अंदाजे २ लाख ३१ हजार रू) चा मुददेमाल मिळून आला असून सदरचे पिस्टल त्यांनी मध्य प्रदेश येथून विक्री साठी आणल्याची कबुली दिली आहे.
बारामती उपविभागामध्ये सन २०२० मध्ये २० गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले होते.२०२१ मध्ये आता पर्यंत ८ गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आलेले असून आतापर्यंत बेकायदेशिर पिस्टल विक्री बाबतची पुणे ग्रामिण पोलीस दलातील सर्वात मोठी कारवाई आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार दादा ठोंबरे,पोलीस कॉस्टेबल नंदु जाधव,राहुल पांढरे,विजय वाघमोडे,मंगेश कांबळे,विनोद लोखंडे,दत्तात्रय मदने, रणजित मुळीक यांनी केलेली आहे.
सदर प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.आरोपींवर ३ गुन्हे नोंद करण्यात आले असून आणखी २ गुन्हे दाखल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.
https://www.facebook.com/103519978211735/videos/903752280372746/