बारामती पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी जाणाऱ्या सतरा गाईंची सुटका
सहा आरोपी ताब्यात
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जळोची मार्केट यार्ड बारामती येथे सतरा भारतीय गोवंशाच्या गाई कत्तलीसाठी जाणार असल्याचे खबऱ्या मार्फत माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली सहायक पोलीस निरीक्षक पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे, सहायक फौजदार जगदाळे, पोलीस हवालदार काळे ,सातपुते पोलीस नाईक सिताप,हे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सदरच्या ठिकाणी दोन पंचांसमक्ष छापा घातला असता जळोची मार्केट यार्ड येथे वेगवेगळ्या वयाच्या एकूण 17 लहान-मोठे गोवंशाचे जातीची जनावरे मिळून आली छापा घातला असता हुसेन शेख वय 21, गवारे फाटा बारामती, इमाम हुसेन शेख 21 गवारे फाटा अनंत नगर बारामती ,मोबीन हरून कुरेशी वय 25 देवळे स्टेट म्हाडा कॉलनी हाजी सैफन शेख, वय 22 राहणार गुणवडी, बिलाल राजा शेख वय 19 राहणार निरावागज, सकिद जावेद कुरेशी वय 18 माडा कॉलनी बारामती हे आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची जनावरे ही जळोची मार्केट यार्ड मध्ये झाडाचे बुंध्याला दोरी रस्सीने बांधून अनधिकृतपणे बाळगून त्याची बेकायदेशीररित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवले असताना मिळून आले. त्यामुळे पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दोन पंचांसमक्ष अंदाजे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला वरील सहा आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे ,सहाय्यक फौजदार जगदाळे ,पोलीस हवालदार काळे, सातपुते ,पोलीस नाईक सीताप या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.