बारामती पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले मोठे घबाड
वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना अटक व चोरीचा मालही हस्तगत आठ घरफोड्या, चोरीचे मोबाईल, चंदनचोर ,गांजा विक्री आरोपी ,दागिने चोरी गुन्हे उघडकीस
बारामती पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले मोठे घबाड
वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना अटक व चोरीचा मालही हस्तगत आठ घरफोड्या, चोरीचे मोबाईल, चंदनचोर ,गांजा विक्री आरोपी ,दागिने चोरी गुन्हे उघडकीस
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठ घरफोड्या करणाऱ्या आरोपीचा शोध पोलिसांनी लावला यामध्ये चंदनाची चोरी करण्यासाठी रेकी करत असताना बेरक्या उर्फ नियोजन संदीप भोसले वय 28 राहणार सोनगाव तालुका बारामती हा चंदनाचे झाड तोडण्यासाठी रेकी करताना खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वरील आरोपीस ताब्यात घेतले त्याच्याकडून चंदन चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य कुऱ्हाड, करवत ,लोखंडी गिरमिट हे साहित्य आढळून आले त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याने बारामतीत सात ते आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली त्याच्याबरोबर गांगोली भोसले व इतर साथीदार यांच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आरोपीस चोरी झालेल्या ठिकाणी घेऊन पाहणी केल्यावर त्याने दाखवलेल्या वेगवेगळ्या चोरीचे ठिकाणी यापूर्वी बारामतीत पोलीस स्टेशनला नोंद झालेल्या गुन्ह्यातील ठिकाणे असल्याचे निष्पन्न झाले आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल 60 हजार किमतीचे सोन्याचा नेकलेस
सोळा हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा कानातील रिंगा, बदाम
एकवीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी अडीच ग्रॅम वजनाची 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण ,डोरली दोन तोळे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याची पिळ्याची अंगठी पाच ग्रॅम, कानातील झुबे चार ग्रॅम नथ एक ग्रॅम, पिळ्याची अंगठी दोन ग्रॅम दहा हजार रुपये किमतीचे सोन्याची अंगठी सहा ग्रॅम तीस हजार रुपये किमतीची कानातील टॉप्स अर्धा तोळा ,डोरले अर्धा तोळा वीस हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम चे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन वाट्या, बारा मणी इत्यादी मुद्देमाल जप्त केला सदरचा मुद्देमाल हा वेगवेगळ्या आठ गुन्ह्यांतील असून आरोपीस पोलिस कस्टडी घेण्यात आले आहे.
मोबाईल दुकान चोरी उघडकिस
दुसर्या एका गुन्ह्यात मारवाड पेठ कृष्णा डेअरी शेजारील बारामती येथील निरंजन दिलीप पारेख यांचे मोबाईल दुरुस्तीचे दुकानाचा दरवाजा उचकटून 41 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हँडसेट अंदाजे किंमत तीन लाख 44 हजार 333 चोरी केल्याचा गुन्हा बारामती पोलीस स्टेशनला दाखल झाला होता त्याचा शोध पोलीस कसून करत असताना आरोपी बालाजी उर्फ बाल्या अनिल माने ,कैकाडगल्ली बारामती यास ताब्यात घेतले व अधिक तपास केला असता त्याने कबुली दिली की त्याच्या बरोबर असणारे साथीदार 1)आतीफ नजमुद्दिन तांबोळी चिमण शहा मळा बारामती 2) साहिल अय्याज शकीलकर, जामदार रोड कसबा 3 ) प्रतीक दिलीप रेडे, बाबर गल्ली 4 ) अनिकेत गायकवाड ,बारामती 5) सलमान बागवान ,कचेरी रोड बारामती (फरारी )व दोन अल्पवयीन बालक यांच्यासह गुन्हा केला होता त्याची कबुली आरोपींनी दिली असून आरोपींना पोलिस कस्टडी घेऊन सर्व मोबाईल रुपये तीन लाख 44 हजार 333 किमतीचे हँडसेट हस्तगत करून पुराव्या कामी जप्त करण्यात आले आहेत वरील तीन, सहा व सात आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे
चंदनचोर ताब्यात
त्याचबरोबर बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील तांदुळवाडी रोड वरील सावंत विश्व बंगल्यासमोरील चंदनाचे झाड चोरी केल्याबाबत दिनांक 7 /11 /2O20 रोजी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा बारामती शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथका मार्फत शोध चालू असताना सदर गुन्ह्यातील आरोपी ची बातमी खबऱ्यामार्फत काढून सदर गुन्ह्यातील चंदनाच्या झाडाची चोरी करणारा आरोपी सचिन नवनाथ शिंदे वय 34 माळेगाव बुद्रुक बारामती यास शिताफीने अटक करून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरी केलेले दोन हजार रुपये किमतीचे चंदनाची दोन लाकडाचे ओंडके व गुन्ह्यात वापरलेली आठ लाख रुपये किंमतीची झायलो कंपनीची फोर व्हीलर गाडी असा एकूण आठ लाख दोन हजार रुपये किमतीचा गुन्ह्यातील माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे .
गांजा चोरून विक्री करणाऱ्या आरोपींवर धाड
बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्री नारायण शिरगावकर साहेब यांना मिळालेल्या बातमीवरून स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे ,सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस नाईक तात्यासाहेब खाडे, रुपेश साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल सुहास लाटणे, दशरथ इंगवले ,चंदू कोठे, योगेश कुलकर्णी ,अजित राऊत, यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली बारामती समर्थ नगर येथे 8.45 वाजता च्या सुमारास दोन पंच व जप्त मालाचे वजन करण्यासाठी किराणा दुकानदार भारत सुभाष मुथा यांचेसह अचानक छापा घातला असता सदर ठिकाणी अमित अनिल धेंडे वय 37 सिद्धार्थनगर ,अमराई हाआरोपी मिळून आला त्यांनी आपल्या कब्जात बेकायदेशीररित्या मादक पदार्थ गांजा स्वतःची कब्जात बाळगला असताना मिळून आला पोलिसांनी अंदाजे बारा हजार दोनशे रुपये किमतीचा 610 ग्रॅम मादक पदार्थ गांजा जप्त केला असून पोलीस कॉन्स्टेबल योगेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून 24 / 10 /20 रोजी एनडी पी एस अॅक्ट 1985 चे कलम 8 क/ बी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन शिंदे करीत आहेत
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीण ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली बारामती पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन शिंदे ,मुकुंद पालवे ,सौ अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिपान माळी ,पोलीस हवालदार अनिल सातपुते ,पोलीस नाईक तात्यासाहेब खाडे, रुपेश साळुंखे, रामदास जाधव ,दादासाहेब डोईफोडे, पांडुरंग गोरवे ,ओंकार सिताप, पोलीस कॉन्स्टेबल सुहास लाटणे, दशरथ इंगवले ,बंडू कोठे ,योगेश कुलकर्णी ,अजित राऊत ,अतुल जाधव, नाथसाहेब जगताप, उमेश गायकवाड यांनी महत्वाची कामगिरी केली या सर्व कामगिरीमुळे बारामती पोलिस दलाची मान उंचावली असून नागरिकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे