स्थानिक

बारामती पोलिसांनी भरले फायनान्सचे हप्ते !

दिव्यांग व्यक्तीच्या मोटरसायकलचे भरले हप्ते, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

बारामती पोलिसांनी भरले फायनान्सचे हप्ते !

दिव्यांग व्यक्तीच्या मोटरसायकलचे भरले हप्ते, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन या वर्षात नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमाने व कारवाईने जिल्ह्यात चर्चेत राहिले आहे. आजही असाच एक अनोखा प्रकार माळेगाव येथील दिव्यांग मधुकर हिरामण वायकर यांच्या बाबतीत घडला.

वायकर यांनी 2019 साली टीव्हीएस कंपनी ची तीन चाकी गाडी घेतली होती.मात्र त्यांच्या गाडीचे हप्ते भरण्यासाठी अडचणी यायला लागल्या अशातच ते बेरोजगार असल्याने फायनान्स कंपनीने हप्ते भरण्यासाठी वाईकर यांच्याकडे तगादा लावला. कसलीही आर्थिक उपलब्धता नसल्यामुळे ते हतबल झाले.

मात्र कोणीतरी त्यांना सांगितले की सावकारी कर्जाविषयी बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे हे तुम्हाला यातून काहीतरी मार्ग काढून देतील म्हणून वायकर हे फायनान्स कंपनीच्या विषयी तक्रार अर्ज घेऊन पोलीस स्टेशनला नामदेवराव शिंदे यांच्यासमोर गेले.

शिंदे यांनी वायकर यांच्याकडून सर्व परिस्थिती जाणून घेतली या कुटुंबावर आर्थिक संकट आलेले आहे. वायकर हे स्वतः दिव्यांग असल्यामुळे त्यांना इतर ठिकाणी जाण्यासाठी या गाडीची खूपच गरज आहे असे म्हणत पी आय शिंदे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना वायकर यांच्या गाडीचे हप्ते भरण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आणि एका तासात 22 हजार रुपये जमा केले व फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांनी या गाडीचे सर्व हप्ते एकाच वेळी भरून वायकर यांना सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याची प्रचिती दिली. आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकतो की पोलीस हप्ते घेतात पण मात्र हे सर्व खोटे ठरवत पोलीस दुसऱ्याचे हप्ते भारतात हे या घटनेने सिद्ध झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!