बारामती बँकेच्या निवडीवरून व्यापारी वर्गात नाराजी?
अनेकानी या बाबत उघड नाराजी व्यक्त केलीय.
बारामती: वार्तापत्र
पक्षा बरोबर एकनिष्ठ राहणारे व्यापारी यांना डावलून इतरांना संधी दिल्या बदल बारामतीच्या व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळात व्यापारी प्रतिनिधी म्हणून अनेकांनी उमेदवारी भरली होती.
परंतु जे उपजत व्यापारी आहेत, पिढ्यानपिढ्या व्यापार करतात. आशा एकनिष्ठ व्यापाऱ्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही.
जुन्या व नव्या चेहऱ्यांना संधी देताना व्यापाऱ्यांना डावलले असल्याचे बोलले जात आहे.
व अनेकानी या बाबत उघड नाराजी व्यक्त केलीय. व्यापाऱ्यांनी स्थापन केलेल्या बँकेत सर्व समाविष्ट संचालक घेणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता, व्यापारी वर्गाला डावलल्याने व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
पवार जुन्या इमारती पाडुन नव्याने उभे करुन हे मी केले असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसते तशाच प्रकारे बँकेचे संस्थापकाच्या कोणत्याही नातेवाईकांना संधी न देता बँक ही मीच स्थापन केली असल्याचा केविलवाणी डाव तर नसेल ना अशीही व्यापारी वर्गात चर्चा सुरु आहे आता पवार यांना व्यापाऱ्यांची गरज नसल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषदच्या निवडणुकीत बँकेच्या निवडणुकीचे पडसाद पडतील असे काही व्यापाऱ्यांनी बारामती वार्तापत्रशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली.