बारामती बंद बाबत कोणत्याही सूचना नाहीत, बारामती सुरुच राहणार प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली माहिती.
नियम पाळा कोरोना टाळा.
बारामती बंद बाबत कोणत्याही सूचना नाहीत,बारामती सुरुच राहणार
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली माहिती.
नियम पाळा कोरोना टाळा.
बारामती:वार्तापत्र लॉकडाऊन मध्ये शासकीय नियमाचे पालन करा अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक असल्याने पुणे पाठोपाठ बारामती बंदहोणार की काय याबाबत नागरिकांच्या संभ्रम निर्माण झाला आहे.
मात्र बारामती बंदबाबत कोणत्याही सूचना नसल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे बारामती शहर सध्या तरी सुरूच राहणार असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे शहर पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागात सोमवारपासून दहा दिवसांसाठी लॉकडाऊन असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर बारामती शहर देखील बंद राहणार की काय याबाबत नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असून बारामती बंद बाबत काही तरी निर्णय होईल
असे वाटत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये बारामती बंद बाबत कोणताही निर्णय झाला नाही.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
अधिकाऱ्यांना दिले आहेत.