बारामती भाजपाचे शहर सरचिटणीस सुरेंद्र जेवरे यांचे पक्षातून तीन वर्षासाठी निलंबन
भाजप मध्ये कार्यरत असलेले सुरेंद्र जेवरे त्यांच्या कार्यशैलीने प्रसिद्धीस आले होते.

बारामती भाजपाचे शहर सरचिटणीस सुरेंद्र जेवरे यांचे पक्षातून तीन वर्षासाठी निलंबन
भाजप मध्ये कार्यरत असलेले सुरेंद्र जेवरे त्यांच्या कार्यशैलीने प्रसिद्धीस आले होते.
बारामती वार्तापत्र
येथील भाजपचे कार्यकर्ते सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे यांना पक्षशिस्तभंगाचा ठपका ठेवत पक्षातून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी जेवरे यांना निलंबनाचे पत्र दिले आहे.
भाजप मध्ये कार्यरत असलेले सुरेंद्र जेवरे त्यांच्या कार्यशैलीने प्रसिद्धीस आले होते. मात्र सहकार्यांना विश्वासात न घेणे तसेच पक्षाच्या आदेशाचे पालन न करणे वरिष्ठबाबत गैरवर्तन करणे अशा प्रकारच्या तक्रारी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.त्याबाबत जेवरे यांच्याकडे विचारणा देखील करण्यात आली होती मात्र जेवरे यांनी पक्षाशी बांधिलकी जपली नाही.
दाखल झालेल्या तक्रारी बाबत वरिष्ठांनी विचारणा केली असता जेवर यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे वरिष्ठ तसेच इतर कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी मान्य असल्याचे गृहीत धरून पक्षातून तीन वर्षांसाठी त्यांना निलंबित केले आहे.यापूर्वी त्यांच्याकडे बारामती शहर सरचिटणीस तसेच कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
सुरेंद्र जेवरे
याबाबत अद्याप आपणास कोणतेही पत्र मिळाले नाही. उलट कामगार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माजी काही दिवसांपूर्वीच निवड झाली आहे. निलंबनबाबत काहीही माहिती नाही मात्र याबाबतचा खुलासा मी लवकरच करेन असे मत सुरेंद्र जेवरे यांनी प्रभातशी बोलताना यावेळी व्यक्त केले.