बारामती मधील जनता कर्फ्यू ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद.
बारामती मधील जनता कर्फ्यू ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
बारामती वार्तापत्र
बारामती शहर व तालुक्यात 180 पोलिस कर्मचारी, 12 अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.
कोरोनाचा शहर व तालुक्या उद्रेक झाल्यानंतर आजपासून बारामती शहर पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय झाला. या नंतर आज पुन्हा एकदा बारामती थंडावली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनीच घरात थांबायचे असल्याने आज बारामती शुकशुकाट अनुभवण्यास मिळाला. पोलिसांनी आज शहरातील सर्व प्रमुख रस्ते बंद केलेले असून मुख्य चौकात मोठा पोलिस बंदोबस्त आहे.
अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संपर्क कमी होऊन कोरोनाची लागण अधिक लोकांना होऊ नये या साठी जनता कर्फ्यूसह शहरातील सर्वच प्रभागांना प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान वैद्यकीय, दूधासह इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतलीजात असल्याचे शिरगावकर यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, जेणेकरुन कोरोनाचा त्यांना प्रादुर्भाव होणार नाही, जाहिर केलेले निर्बंध हे लोककल्याणासाठीच असल्याने नागरिकांनी त्याला सहकार्य करण्याचे आवाहन औदुंबर पाटील यांनी केले. शहरातून वावरणाऱ्या आज अनेक ठिकाणचे रस्ते बंद असल्याने मोठी कसरत करावी लागली.