बारामती मधील डॉक्टरांची कमाल शस्त्रक्रियेविना छातीतील २ रुपयांचे नाणे काढले बाहेर
लालबीगे कुटुंबीयांनी मानले डॉक्टरांचे आभार
बारामती मधील डॉक्टरांची कमाल शस्त्रक्रियेविना छातीतील २ रुपयांचे नाणे काढले बाहेर
लालबीगे कुटुंबीयांनी मानले डॉक्टरांचे आभार
बारामती वार्तापत्र
बारामती येथील दक्ष लालबीगे या चार वर्षीय बालकाने चुकून दोन रुपयांचे नाणे गिळले त्यानंतर त्याचे पालक घाबरलेल्या अवस्थेत श्रीपाल रुग्णालयात पोहचले. दक्ष चा एक्सरे रिपोर्ट काढल्यावर नाणे दक्षच्या छातीत अडकल्याचे दिसत होते. त्यानंतर डॉ.राजेंद्र मुथा यांनी क्षणाचाही विलंब न करता भूलतज्ञ डॉ. अमर पवार व कान-नाक घसा तज्ञ डॉ.वैभव मदने यांना तातडीने बोलावून छातीत अडकलेले नाणे कोणतीही शस्त्रक्रिया न करता योग्य इलाज करत अवघ्या वीस मिनिटात बाहेर काढले.
या मध्ये भुलतज्ञ डॉ.अमर पवार व कान-नाक घसा तज्ञ डॉ.वैभव मदने यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.लहान मुलांना होणारा त्रास सांगता येत नाही मात्र डॉ.मुथा व त्यांचे सहकारी डॉक्टर दांडग्या अनुभवावरून लहान मुलांना बरं करतात याची प्रचिती अनेकांना बऱ्याच वेळा आली आहे.
या केलेल्या कामगिरीची प्रशंसा करत लालबीगे कुटुंबियांनी डॉ.राजेंद्र मुथा व इतर सहकारी डॉक्टरांचे जाहीर आभार व्यक्त केले.