बारामती मध्ये कडक लॉकडाऊन ची अंबलबजावणी सुरू.
गर्दी चे रस्ते निर्मनुष्य.
बारामती:वार्तापत्र
नेहमी गर्दी चे रस्ते लॉकडाऊन मुळे आता निर्मनुष्य झाले आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शहरात आजपासून लॉकडाऊन सुरू असून दि.२३ पर्यंत कायम राहणार आहे. बारामती नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून शहराच्या चौबाजूच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट असून सर्व रस्ते निर्मनुष्य असल्याचे चित्र दिसत आहे त्याचे फोटो. ????
पुढील आठ दिवसांपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मास्क न वापरणे, विनाकारण रस्त्यावर फिरणे, गर्दी करून थांंबणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याकामी नगरपालिका प्रशासन पोलिसांना मदत करत आहे.