बारामती मध्ये कसबा येथील ६७ वर्षाचे पुरुषाला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
अशी माहिती तालुका अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती मध्ये सुतार नेट शाळा क्रमांक 2 समोर कसबा बारामती.येथील ६७ वर्षाचे पुरुषाला कोरोना अहवालही पॉझिटिव्ह.
बारामतीत काल ६५ जणांचे नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ६३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये सकाळीच भिकोबानगर येथील ज्येष्ठानंतर, शहरातील सुतार नेट शाळा क्रमांक 2 समोर कसबा बारामती.येथील ६७ वर्षीय नागरीकाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
काल दिवसभरात बारामतीतील ६५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये ६३ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर भिकोबानगर येथील एका ज्येष्ठ नागरीकाला कोरोनाची लागण झाल्याचे सकाळीच स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रतिक्षित असलेला अहवालही पॉझिटिव्ह आला असून बारामती शहरातील कसबा येथील ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरीकाला कोरोनाची लागण झाली आहे.