
बारामतीत कोरोनाने घेतला दहावा बळी .
बारामतीत आज एकूण कोरोना बळींची संख्या दहा झाली असून चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
बारामती:वार्तापत्र.
आज दिनांक २४ जुलै रोजी कोरोना बळी ची संख्या १० झाली आहे. तर सकाळी नऊ वाजे पर्यंत ४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे त्यात एक राजकीय पदाधिकारी यांचा समावेश आहे.
कोरोनाने दहावा बळी शहरातील नामवंत डॉक्टर व्यक्तीचा यात बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
काल बारामती मध्ये एकूण ५९ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी ५४ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरांमधील चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या मध्ये खंडोबा नगर मधील रुग्णाच्या संपर्कातील तिची ६५ वर्षाची आई तसेच विठ्ठल प्लाझा कसब्या मधील रुग्णाच्या संपर्कातील २४ वर्षाची महिला व सूर्य नगरी येथील रुग्णाच्या संपर्कातील ३१ वर्षाचा पुरुष व संघवी पार्क बारामती येथील राजकीय पदाधिकारी असलेला ३२ वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे अजून पाच अहवाल प्रतीक्षेत आहे.
दरम्यान, आज बारामतीतील वैदकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी या व्यक्तीने हिरीरीने सहभाग घेत सामाजिक उपक्रम राबवले होते. त्यांच्या मृत्यूमुळे बारामतीतील कोरोना बळींची संख्या दहावर पोहोचली आहे.