बारामतीत क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन मारामारीत; ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्यावरून वाद

बारामतीत क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन मारामारीत; ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्यावरून वाद
बारामती:वार्तापत्र
क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन दोन गटांमधील मारामारीत झाले. शुक्रवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीत तब्बल 31 जणांविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल केले आहेत. तर 27 जणांविरुद्ध साथ रोग प्रतिबंधक कायद्याखाली देखील गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी यातील काही जणांना अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असंलेल्या श्रावण गल्लीत क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन मारामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही गटांनी फिर्यादी दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या दरम्यान, पोलिस हवालदार शिवाजी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ जणांविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा, तसेच कोरोना कालावधीत नियमांचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.