बारामती मध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्णाची आज वाढ.
एकूण रुग्ण संख्या १११ होय .
बारामती:वार्तापत्र
रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देसाई इस्टेट मध्ये आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत बारामतीत 45 नमुन्यांपैकी फक्त दोघांना कोरोना झाल्याची नोंद झाली. 43 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
आज बारामतीत कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील 45 जणांचे नमुने नेमका काय परिणाम दाखवतात याची उत्सुकता बारामतीकरांसह तालुक्याला होती, परंतु आज गेल्या काही दिवसातला पहिला दिवस असा होता की, या दिवशी सकाळी कोणताही रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल नव्हता. सकाळी 31 जण निगेटिव्ह आल्यानंतर उरलेल्या 15 नमुन्यांची तपासणी सुरू होती. त्यामध्ये देसाई इस्टेट परिसरातील आढळलेल्या कोरोनाग्रस्त च्या संपर्कातील दोघेजण पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली त्यामुळे बारामती करांनो काळजी घ्या असे आव्हान करण्यात आले आहे.