
बारामती मध्ये रविवारी मोफत कॅन्सर निदान शिबिर
सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
बारामती वार्तापत्र
मेडिकोज गिल्ड, बारामती, भगिनी मंडळ, बारामती, बारामती स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना, सिल्वर ज्यूबिली हॉस्पिटल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि ग्रामीण महिला रुग्णालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन सिल्वर ज्यूबिली उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.सदर शिबिरामध्ये महिलांची स्तन कॅन्सर व गर्भाशयमुख कॅन्सर साठी प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांची पुढील तपासणी मोफत किंवा सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.
सदर कॅन्सर प्रकारांचे महिलांच्यामधील वाढते प्रमाण लक्षात घेता वेळीच निदान झाले तर या आजाराची गुंतागुंत टाळता येऊन रुग्णांच्या जिविताची हानी टाळता येते.
या दृष्टीने जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.