बारामती मध्ये सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश.
सलून दुकाने बंद ठेवण्यासलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश...
सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश...
बारामती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाचव्यांदा टाळेबंदीचा कालावधी वाढविला आहे. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने लॉकडाऊन पाच मध्ये सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
टाळेबंदी दरम्यान मागील दोन महिन्यांपासून सलूनची दुकाने बंद होती. मात्र ग्रीन झोन क्षेत्रात मागील पंधरा दिवसांपासून सशर्त अटी वरून सलून दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने लॉगडाऊन पाच मध्ये पुन्हा सलून ची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.शासनाच्या आदेशावरून आजपासून बारामती शहरातील सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
आदेशाचे पालन न करणाऱ्या सलून व्यावसायिकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.