
बारामती मध्ये सापडले पुन्हा दोन कोरोना रुग्ण.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान.
बारामती:वार्तापत्र मंगळवार 2 जुलै रोजी बारामती शहरात दोन कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. बारामतीत नव्याने लोणी भापकर आणि बारामती शहर असे मिळून दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी ही माहिती दिली.
लोणी भापकर येथील रुग्ण हा पोलीस असून तो लोणावळ्यावरून येथे आलेला होता.
लोणावळ्यातील त्याच्या खोलीतील सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून
आल्याने हा पोलीस कर्मचारी लोणी भापकर येथे आला होता, त्याची तपासणी केली असता, आज तो देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे, तर
बारामती शहरातील अर्बन ग्राम येथील कालच्या कोरोनाग्रस्त आयटी
अभियंत्याच्या संपर्कातील सहा जणांची तपासणी करण्यात आली होती.
त्यामध्ये त्याच्या भावासही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.
आज आढळलेल्या नव्या रुग्णांवरही रुई येथील केअर सेंटर मध्ये उपचार सुरू
आहेत.
दरम्यान आज नव्याने दोन रुग्ण आढळून आल्याने बारामती शहरात
सर्व नियम पाळा असे प्रशासन तर्फ सांगण्यात आले आहे.