बारामती मार्केट कमिटी मध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणीस सुरूवात
खरीप हंगाम २०२०-२०२१ मधील किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी दि.१/१०/२०२० पासुन सुरू करण्यात आली आहे.

बारामती वार्तापत्र
सोयाबीन खरेदीला सुरूवात दि. १५ ऑक्टोबर २०२० पासुन होणार आहे. त्यासाठी शेतक-यांनी खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी. चालु हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे. बाजारभाव हमीभावा पेक्षा कमी असल्याने शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तरी शेतक-यांनी सोयाबीन खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा असे आवाहन बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे व उपसभापती बाळासो पोमणे यांनी केले. शेतक-यांनी नाव नोंदणी साठी सोयाबीन पिकाची नोंद असलेल्या ७/१२ उतारा, आधारकार्डची छायांकित प्रत व बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे
आणुन निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक बारामती येथे प्रथम ऑनलाईन नाव नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या शेतक-यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. खरेदी केंद्रावर शेतक-यांनी आपला शेतमाल स्वच्छ व वाळवुन आणावा. सोयाबीनचा हमीभाव रू.३,८८०/- प्रति क्विंटल दर असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.