बारामती येथील डॉ. प्रियांका जळक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शासकीय यंत्रणेस रुग्णवाहिकेची भेट
सिल्वर जुबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे यांनी जळक कुटुंबाचे मानले आभार.
बारामती येथील डॉ. प्रियांका जळक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शासकीय यंत्रणेस रुग्णवाहिकेची भेट.
सिल्वर जुबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे यांनी जळक कुटुंबाचे मानले आभार.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील कोवीड रुग्णालय रूई व उपजिल्हा रुग्णालय बारामती येथे कोरोना योद्धा म्हणून काम करत असलेल्या डॉ.प्रियांका जळक यांचा वाढदिवस आज खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.कारण आज डॉ. प्रियांका जळक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे पती डॉक्टर आशिष जळक यांनी पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून डॉक्टर प्रियांका यांच्या हस्ते आपल्या रुग्णालयातील चालू स्थितीतील रुग्णवाहिका सिल्वर जुबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे [वैद्यकीय अधीक्षक सिल्वर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालय.],डॉ. सुजित अडसूळ [आय एम ए चे सदस्य व बारामतीतील भूलतज्ञयां ]च्याकडे भेट म्हणून सुपूर्द केली.
डॉ. प्रियांका,डॉ.आशीष व डॉ. शशांक जळक हे एकाच कुटुंबातील कोविड योद्धे या कोरोना महामारीच्या आपत्तीच्या काळात वैद्यकीय सेवा प्रदान करत आहेत.
सिल्वर जुबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी यावेळी जळक कुटूंबियांचे आभार मानले.
IMA च्या महाराष्ट्र राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समिती चे सदस्य डॉ. सुजीत अडसूळ यांनी या तरूण डॉक्टरांचा आदर्श महाराष्ट्रातील डॉक्टरांनी घ्यावा आणि शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.