बारामती येथील सुप्रसिद्ध ‘हॉटेल चैत्राली’ आगीत जळून खाक!
आज सकाळी अचानक आग लागली.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील गुनवडी चौकात असलेल्या सुप्रसिद्ध ‘हॉटेल चैत्राली’ शॉक सर्किट मुळे आग लागली असून संपूर्ण हॉटेल आगीत जळून खाक झाल्यामुळे हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर शेजारी च असलेल्या एका जुन्या इमारतीचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान आग लागली असल्याचे समजताच शेजारील नागरिकांनी माहिती दिल्यानंतर बारामती नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले आहे.