स्थानिक

बारामती लोक अदालतीमध्ये 2 हजार 352 खटले निकाली

महसुल सुमारे 5 कोटी 74 लाख7 9 हजार 259 रुपयांची रक्कम वसूल झाली.

बारामती लोक अदालतीमध्ये 2 हजार 352 खटले निकाली

महसुल सुमारे 5 कोटी 74 लाख7 9 हजार 259 रुपयांची रक्कम वसूल झाली.

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय बारामती व वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी दि 25/9/2021रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करणेत आले होते या राष्ट्रीय लोक अदालतचे उद्धघाटन मा जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मा श्रीमती जे पी दरेकर मॅडम व मा तदर्थ तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश मा डी जे बांगडे साहेब मा जे ए शेख साहेब तसेच मा न्यायाधीश मा कांबळे साहेब मा गिरे साहेब व बारामती वकील संघटना अध्यक्ष अॅङ चंद्रकांत सोकटे यांचे हस्ते दिप प्रज्वलित करुन करणेत आले यामध्ये प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले.

महसुल सुमारे 5 कोटी 74 लाख7 9 हजार 259 रुपयांची रक्कम वसूल झाली.

सकाळी 10 वाजता कामकाजाला सुरुवात झाली. वैवाहिक वाद, दिवाणी खटल्यांसह मोटार अपघात, एनआय ऍक्ट, औद्योगिक वाद, घरपट्टी, पाणीपट्टी आदी प्रकरणांवर न्यायनिवाडा झाला. . प्रलंबित खटले 218 दाखल पूर्व प्रकरणे 2134 असे एकुण 2352 प्रकरणे निकाली काढणेत आलेनिवाड्यासाठी एकुण 10774 प्रकरणेठेवण्यात आले होते. त.जिल्हा न्यायाधीश-1 व अति.सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज झाले. लोकअदालत यशस्वी होण्यासाठी बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे व कार्यकरणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅङ चंद्रकांत सोकटेअध्यक्ष बारामती वकील संघटना यांनी केले व अध्यक्षीय मनोगत मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा श्रीमती जे पी दरेकर मॅडम यांनी केले व सुत्र संचालन अॅङ धिरज लालबिगे यांनी केले आभार संघटनेचे सचिव अॅङ अजित बनसोडे यांनी मांडले या कार्यक्रमास बहुसंख्य वकील वकील पक्षकार उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!