स्थानिक

बारामती व्यापारी आणि कामगारांची अँटिजेन टेस्ट, १००% निगेटिव्ह ,बा.न.प.व पंचायत समिती आरोग्य विभागाची मोहीम

ही मोहिम रोज सुरू राहणार आहे

बारामती व्यापारी आणि कामगारांची अँटिजेन टेस्ट, १००% निगेटिव्ह ,बा.न.प.व पंचायत समिती आरोग्य विभागाची मोहीम

ही मोहिम रोज सुरू राहणार आहे

बारामती वार्तापत्र

बारामती नगर परिषद व पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या वतीने बारामती शहरातील व्यापारी व त्यांच्या दुकानातील कर्मचारी यांची अँटिजेन तपासणी केली. पहिल्या दिवशी ९६ जणांची अँटीजन तपासणी करण्यात आली,या सर्वांचे रिपोर्ट ‌ निगेटिव्ह आले .नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

बारामती शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने स्थानिक प्रशासनाने बाजारपेठा उघडण्यास परवानगी दिल्याने शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी होते आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना वाढीसाठी मदत होऊ नये, यासाठी बारामती नगर परिषद व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाणे संयुक्तपणे सुभाष चौकातून तपासणी मोहिमेला सुरवात केली.

यामध्ये दुकानातील मालक व कामगार यांची अँटिजेन तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ही मोहिम रोज सुरू राहणार आहे.तपासणी करण्यासाठी चांगला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे संतोष तोडकर व जनसंपर्क अधिकारी सचिन खोरे यांनी सांगितले.तसेच प्रत्येक कामगाराची तपासणी बंधनकारक आहे.तर कोणी कोरोना बाधित आढळले तर त्याच्यावर उप जिल्हा रुग्णालय येथे उपचार करणार आहे.आम्हाला जसे अँटीजेन किट उपलब्ध होतील तशी तपासणी करणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची उपजिल्हा रुगणल्यात तपासणी करणे आवश्यक आहे.यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे, कोविड सेंटर प्रमुख शाम उपाध्ये बा.न.प.,पंचायत समिती व्यापारी महासंघ तसेच अतिक्रमण विभागाचे सागर भोसले,किरण साळवे, अनिष मोरे सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!