बारामती व इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी.
आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बारामती व इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी.
आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बारामती वार्तापत्र
सकाळी 5 हजार क्युसेक्स एवढ्या क्षमतेने पाणी सोडलेल्या नीरा नदीत नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या प्रचंड पावसामुळे संध्याकाळी पाण्याचा विसर्ग थेट 32 हजार क्युसेक्स वर पोहोचलेला आहे. त्यामुळे नीरा नदी भरून वाहणार असून नदीकाठच्या भागातील गाव, वाड्यावस्त्या तसेच शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
नीरा-देवघर गुंजवणी वीर व भाटघरच्या धरण क्षेत्रात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने धरण पाणीसाठ्यात अचानकच वाढ झालेली आहे.
त्याचा विचार करता आज सकाळी जलसंपदा खात्याने वीरचे तीन दरवाजे उघडून पाच हजार क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडला होता, परंतु त्यानंतर तो दुपारी 14 हजार क्युसेक्स व त्यानंतर संध्याकाळी 23 हजार 632 पर्यंत वाढवला. तरीदेखील पाण्याचा साठा सातत्याने वाढत असल्याने जलसंपदा खात्याने संध्याकाळी साडेसात वाजता सात दरवाजे सोडून पाण्याचा विसर्ग 32 हजार 368 क्युसेक्स एवढ्या क्षमतेने पाणी नीरा नदीत सोडले आहे.
बारामती तसेच इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या गावातील लोकांनी सावधानता बाळगून काळजी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.