बारामती मध्ये आज चार कोरोना पॉझिटिव्ह ची वाढ.
काळजी घेण्याचे आव्हान.
बारामती:वार्तापत्र
बारामती येथे तपासणी झालेल्या एकूण नमुन्यांपैकी आज आलेल्या अहवालामध्ये ४ जण कोरोनाबाधित झाले आहेत.
बारामतीत काल ४५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यातील ३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उर्वरीत तिघांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. आज कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये खंडोबानगर येथील दोन, समर्थनगर, गुणवडी रोड येथील एक आणि श्रीराम गल्ली येथील एक अशा चौघांचा समावेश आहे.
आज आढळून आलेले ४ कोरोनाबाधित पुरुष रुग्ण असून यामध्ये २९ वर्षापासून ५९ वर्षापर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे. बारामती तालुक्यात आज अखेर ११९ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले, त्यापैकी ६२ जणांनी कोणावर मात केलेली आहे. वेगवेगळ्या सेंटरमध्ये व दवाखान्यात उपचार घेत असणारे रुग्ण ४४ व घरी उपचार घेत असणारे २ रुग्ण असे एकूण ४६ रुग्ण उपचार घेत आहेत व ११ रुग्णांचा मृत्यू आजअखेर झालेला आहे.