बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
९६ जणांना प्रत्येकी ३०१ चौरस फुटांचे घर मिळणार

बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
९६ जणांना प्रत्येकी ३०१ चौरस फुटांचे घर मिळणार
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्यावतीने वार्ड क्र. 11 येथील सामाजिक सभागृह व महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ व बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, आमराई येथील 276 सदनिकांचा भूमीपुजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील या जागेवर १९७१ सालापासून खेळाच्या मैदानाचे आरक्षण होते. जुन्या वसाहतीमध्ये ९६ खोल्या होत्या. ही इमारत धोकादायक झाल्यानंतर पालिकेने नागरिकांचे पुनर्वसन करीत इमारत पाडली. परंतु, त्याचवेळी पक्की घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यानुसार शनिवारी भूमिपूजन पार पडले. पहिल्या टप्प्यात १०० घरे बांधली जाणार आहेत. त्यात पुनर्वसन केलेल्या ९६ जणांना प्रत्येकी ३०१ चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
तीन टप्प्यांत सुमारे २७६ घरे आंबेडकर वसाहत व साळवेनगर येथे उभारली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, महाहौसिंगकडून मदत मिळणार आहे. प्रत्येक घरासाठी केंद्राकडून दीड लाख, राज्याकडून एक लाख, कामगारकल्याण विभागाकडून एक लाख, तर माता रमाई मागासवर्गीय निवारा योजनेतून एक लाख रुपये प्रत्येक घरासाठी मिळणार आहेत.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर भिसे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव,नगरसेवक बिरजू मांढरे, मयूरी शिंदे, अनिता जगताप, नीता चव्हाण, सीमा चिंचकर, सविता जाधव, सुधीर पानसरे, नवनाथ बल्लाळ, संजय संघवी, सत्यव्रत काळे,यांच्यासह नगरपरिषदेचे सदस्य, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.