बारामती शहरातील मंडई समविषम पध्दतीने सुरू होणार.
वाहने मंडई मध्ये आणण्यास बंदी.
बारामती वार्ताहर: बारामती शहरातील मंडई सम विषम तारखे नुसार सुरू होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रूग्ण आढळत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधनात्मक उपाययोजना आखणे म्हणून शहरातील सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते.
शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता, बारामती नगरपरिषद बारामती शहरातील श्री गणेश मार्केट भाजी मंडई व सुर्यनगरी भाजी मंडई मधिल बसाणा-या विक्रेत्यांसाठी समविषम पध्दत लागू राहिल व सर्व प्रकारच्या वाहनांना मंडई आवारात येण्यास सक्त मनाई राहील,सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ जसे सिगारेट तंबाखू सेवन करणे व धुंकणे यांस सक्त मनाई आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांस अधिन राहुन शनिवार दिनांक ०६/०६/२०२० पासुन सकाळी ९ ते ५ या वेळेत मंडई चालु करण्यास येणार आहे सदरहू भाजी मंडई चालु करीत असताना या आदेशात हे ही नमुद करणेत येत आहे की, गुरवारी भरणारा अठवडे बाजारासाठी स्वतंत्र आदेश देण्यात येणार आहे उपरोक्त सर्व बाबींचे पालन करत असताना सोशल डिस्टंसिंग,मास्क, सॅनिटायझर,ग्लोज आणि इतर तदअनुषांगिक बार्बीचे पालन करावयाची जबाबदारी संबंधित व्यावसायधारकाची राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल.