बारामतीत दहा जण दिवसभरात कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू.
बारामतीतील एकूण रुग्णसंख्या 566 झालेली आहे.
बारामतीत दहा जण दिवसभरात कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू.
बारामतीतील एकूण रुग्णसंख्या 566 झालेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती मध्ये घेतलेल्या १४७ जणांच्या कोरोना नमुना तपासणीत तब्बल ११८ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याने तो एक मोठा दिलासा बारामतीकरांना मिळाला, मात्र दहा जण कोरोनाबाधित आले व दिवसभरात आज दोघा जणांचा कोरोनाने बळी घेतला. आतापर्यंत बारामती तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या २९ वर पोचली.
काल रात्री ग्रामीण रुग्णालय येथे रुई येथे उपचार सुरू असताना आंबी खुर्द येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे, तर बारामती शहरातील महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बारामती शहरातील एक महिला व कांबळेश्वर येथील एक रुग्ण असे दोन जण सकाळी कोरोनाबाधित आढळले होते. त्यापैकी महिलेचा मृत्यू झाला.
आज बारामतीमधील खाजगी प्रयोगशाळेमध्ये दिवसभरात घेतलेल्या ४२ नमुन्यांपैकी बारामती शहरातील ६ व ग्रामीण भागातील २ असे आठ रुग्णांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आढळला आहे.
मोतीबाग इंदापूर रोड 1,सराफ पेट्रोल पंपाशेजारी 1, अशोक नगर 1,
मार्केट यार्ड रोड 1, पाटस रोड सराफ पेट्रोल पंपाजवळ 1 माळेगाव 1
व पणदरे 1.
यातील उर्वरित 36 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
बारामतीतील एकूण रुग्णसंख्या 566 झालेली आहे
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.