बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील 11 असे एकूण 25 रुग्णांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहेत.
बारामतीची रुग्ण संख्या 824 झालेली आहे.
बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील 11 असे एकूण 25 रुग्णांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहेत.
बारामतीची रुग्ण संख्या 824 झालेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती मध्ये रात्री उशिरापर्यंत 23 जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर रात्री तपासलेल्या नमुन्यांमध्ये पुन्हा नव्याने 25 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, तर एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याने बारामतीतील कोरोना बळींची संख्या 34 वर पोहोचली आहे.
काल बारामती मध्ये एकूण 113 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 76 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अकरा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील 11 असे एकूण 25 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व दौंड मधील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे.
बारामतीची रुग्ण संख्या 824 झालेली आहे. रात्री ग्रामीण रुग्णालय रूई येथे उपचार सुरू असताना चोपडज येथील वृद्धाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूंची संख्या 34 झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील श्रीराम नगर येथील दोन, अमराई येथील 2, माऊली नगर जळोची येथील एक, जामदार रोड येथील एक, बुरुड गल्ली येथील एक, देवळे पार्क येथील एक, जुना मार्केट येथील एक, संभाजीनगर येथील एक, बारामती शहरातील 4 रुग्ण असे शहरातील 14 व निंबुत येथील तीन, गुणवडी येथील 2, पंधरे येथील एक, मूर्टी येथील एक, बर्हाणपूर येथील एक, सुपा येथील एक, काटेवाडी येथील एक, अंजणगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.