बारामतीत आज खाजगी प्रयोगशाळेतील 13 व शासकीय प्रयोगशाळेतील 17 असे एकुण 30 रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत.
बारामतीची एकुण रुग्ण संख्या 503 झाले आहे.
बारामतीत आजा खाजगी प्रयोगशाळेतील 13 व शासकीय प्रयोगशाळेतील 17 असे एकुण 30 रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत.
बारामतीची एकुण रुग्ण संख्या 503 झाले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत तपासणीसाठी घेतलेल्या 138 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकूण 118 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बारामती शहरातील 9 व ग्रामीण भागातील 8 असे सतरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून इंदापूर तालुक्यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई येथील एक, तांदूळवाडी येथील एक, सूर्यनगरी येथील दोन, कसबा येथील एक, बारामती शहरातील 2, डॉमिनोज पिझ्झा हट शेजारील एक व उपजिल्हा रुग्णालयातील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी असे नऊ जणांचा समावेश आहे तसेच पणदरे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील सहा जण व काटेवाडी येथील 2 असे ग्रामीण भागातील आठ असे एकूण 17 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये काल एकूण 45 नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील आठ व ग्रामीण भागातील 5 असे 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट मधील एक, अशोक नगर मधील एक, सिद्धार्थ नगर हौसिंग सोसायटीमधील एक, अंबिका नगर मधील एक ,हरिकृपा नगर मधील एक, नक्षत्र गार्डन येथे एक, संघवीनगर येथील एक व तांदुळवाडी येथे एक असे आठ रुग्ण व करंजेपुल येथील एक माळेगाव येथील दोन, कोऱ्हाळे बुद्रुक येथील एक व कांबळेश्वर येथील एक असे पाच व एकूण 13 एंटीजेन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे काल दिवसभरात एकूण 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत
बारामतीची रुग्ण संख्या 503 झाले आहे त्याचप्रमाणे कालपर्यंत बारामतीतून बरे झालेल्यांची संख्या 244 आहे.
बारामतीकरांना प्रशासना मार्फत आवाहन करण्यात येते की कोरोनाला घाबरू नका परंतु काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका तसेच 60 वर्षावरील व्यक्ती व कोमोर्बीड व्यक्ती यांनी घराबाहेर पडू नये व घरांमध्ये सुद्धा अलगीकरणामध्ये राहावे तसेच इतरांनी सुद्धा कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरावा, सॅनीटायजरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग पाळावे : डॉ. मनोज खोमणे तालुका आरोग्य अधिकारी बारामती.