बारामती शहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा
विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या माध्यमातून जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती
बारामती शहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा
विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या माध्यमातून जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत सात जणांवर कारवाई केली. पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकपदीशहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत सात जणांवर कारवाई केली. यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर फास आवळला आहे. आज बारामतीतही ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या माध्यमातून जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांना दिसले.
या सेंटर्सवरुन ऑनलाईन जुगाराची साधने, संगणक संच, प्रिंटर, वायफाय राऊटर, कागदी चिठ्या, मोबाईल फोन, रोख रक्कम असा 3 लाख 63 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल गोरे, शिवाजी ननावरे, साहय्यक फौजदार राजेंद्र थोरात, श्रीकांत माळी, हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, रौफ इनामदार, ज्ञानदेव क्षीरसागर, काशिनाथ राजापुरे, प्रवीण मोरे, प्रसन्नजीत घाडगे यांनी ही कारवाई केली आहे.