बारामती शहर पोलिसांची कारवाई , चार लाख रुपयांचे मोबाईल फिर्यादीस परत
गुन्हा रजि.नंबर ५५६/२०२० भा.द.वि कलम ४५७,३८०,३४, प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता
बारामती शहर पोलिसांची कारवाई , चार लाख रुपयांचे मोबाईल फिर्यादीस परत
गुन्हा रजि.नंबर ५५६/२०२० भा.द.वि कलम ४५७,३८०,३४, प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत मौजे मारवाड पेठ कृष्णा डेअरी शेजारी बारामती ता.बारामती जि.पुणे येधील निरंजन दिलीप पारख यांचे मोबाईल दुरूस्तीचे दुकानाचा दरवाजा उचकाटुन एकुण ४१ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल किंमत ३,४४,३३३/-रूपये चोरीस गेले बाबत निरंजन पारख यांनी दि.११/११/२०२० रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तकार देऊन
गुन्हा रजि.नंबर ५५६/२०२० भा.द.वि कलम ४५७,३८०,३४, प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता
त्याप्रमाणे बारामती शहर पोलिसांनी गुन्हयातील आरोपींची नावे निष्पन्न करून आरोपीचा घेऊन गुन्हयातील आरोपी १) बालाजी उर्फ बाल्या अनिल माने रा. कैकाडगल्ली बारामती जि पुणे २) आतिफ नजामुददीन तांबोळी रा चिमनशहामळा बारामती ता बारामती जि. पुणे (अटक). ३) साहिल अय्याज शकीलकर रा.जामदार रेड कसबा ता बारामती जि.पुणे ४) प्रतिक दिलीप रेडे रा बाबरगल्ली ता.बारामती जि.पुणे अल्पवयीन बालक नामे ५) प्रतिक शशीकांत सावंत रा बाबरगल्ली बारामती ता बारामती जि.पुणे(ताबा). अल्पवयीन बालक नामे ६) विश्वजीत बारीकराव यमगेर रा.जगदाळे तालीम आमराई,ता.बारामती जि.पुणे यांच्याकडून फिर्यादी निरंजन दिलीप पारख यांना त्यांचे चोरीस गेलेले सर्व मोबाईल 3 लाख 44 हजार 333 रुपये किमतीचे एकूण 41 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हँडसेट परत देण्यात आले
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे , सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस नाईक रुपेश साळुंखे ,सुहास लाटणे ,दशरथ इंगवले ,बंडू कोठे, योगेश कुलकर्णी ,अजित राऊत ,तुषार चव्हाण ,अकबर शेख, अशोक शिंदे यांनी केली