कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार हृदयविकाराचा झटका आल्याने यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन
चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार हृदयविकाराचा झटका आल्याने यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन
चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू
प्रतिनिधी
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुनीतच्या मृत्यूनंतर कर्नाटक राज्यात सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. ही बातमी कळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही पुनीतला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.