बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन घरफोडी चोरी मध्ये चोरीस गेला माल फिर्यादी यांना परत
चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जशाचे तसे परत मिळाल्याचे व खुप आनंद झाला
बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन घरफोडी चोरी मध्ये चोरीस गेला माल फिर्यादी यांना परत
चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जशाचे तसे परत मिळाल्याचे व खुप आनंद झाला
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत मागील काही दिवसात घरफोडीचे प्रमाण वाढले होते त्यामध्ये
१) बारामती शहर पो.स्टे.गु.र.नं.२२५/२०१९ भा.द.वी.का.क.३८०,४५७ प्रमाणे दिनांक ०६/०३/२०२० रोजी फिर्यादी नामे संतो दत्तात्रय कुलकर्णी वय.४८वर्ष रा.खत्रीपार्क,श्री गजानन बंगला बारामती हे कुटूंबासह दिनांक ०५/०३/२०२० रोजी बाहेरगावी गेले होते ते पुन्हा दिनांक ०६/०३/२०२० रोजी घरी परत आले असता घराचा कडी कोयडा तोडुन घरातील एकुन ६५,०००/ रूपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झालेली होती.त्यावरून त्यांनी दिलेले फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल होता.
२) बारामती पहर पो.स्टे.गु.र.नं.३५४/२०१९ भा.द.वी.का.क.३८०,४५७ प्रमाणे दिनांक ३०/०४/२०२० रोजी फिर्यादी नामे संतोष म्हसु गायकवाड वय.५२वर्ष रा.वसंतनगर बारामती जि.पुणे हे त्यांचे कुटूंबासह दिनांक २९/०४/२०१९ रोजी बाहेरगावी गेले होते ते पुन्हा दिनांक ३०/०४/२०१९ रोजी घरी परत आले असता घराचा कडी कोयडा तोडुन घरातील एकुन ६४,१००/- रूपये किमतीच्या सोन्याचे दागिन्यांची चोरी झालेली होती.त्यावरून त्यांनी दिलेले फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल होता.सदर घरफोडीचा शोध घेण्याबाबतच्या सुचना मा.पोलीस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख सो व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते साो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर सो यांनी केलेल्या होत्या त्यावरून मा.पोलीस निरीक्षक श्री.नामदेवराव शिंदे सो व त्यांचे स्टाफने अज्ञात चोरटयाचा कसोशिने शोध सुरू केला होता.सदर घटनेचा शोध घेत असताना सहा.पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे,व गुन्हे शोध पथकाचा स्टाफ पो.ना.दादा डोईफोडे,पो.ना.ओंकार सिताप,पो.कॉ.सुहास लाटणे.अविनाश दराडे,दशरथ इंगोले,योगेश कुलकर्णी,तुषार चव्हाण अकबर शेख,अतुल जाधव यांनी समांतर तपास करून दोन्ही गुन्हयातील आरोपी नामे १) बेरडया उर्फ नियोजन संदिप भोसले वय.२८वर्ष रा.सोनगाव ता.बारामती जि. पुणे यास अटक करून त्याचेकडुन वरील दोन्ही गुन्हयातील मुददेमाल जप्त करण्यात आलेला होता.
तो आज दिनांक ०४/०२/२०२१ रोजी यातील फिर्यादी यांना परत करण्यात आले.सदर वेळी कॅनरा बँकेचे मुख्य प्रबंधक श्रीशैलेष दराडे,पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे,पोलीस उपनिरीक्षक श्री.जाधव,पो.हवा ढोले हे उपस्थित होते.सदरवेळी चोरीस गेलेला मुददेमाल परत मिळेल असे कधीही वाटले नव्हते परंतु आमचा चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जशाचे तसे परत मिळाल्याचे व खुप आनंद झाला असल्याचे फिर्यादी यांनी सांगुन पोलीस दलाचे अभार मानले आहेत.