बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मादक पदार्थ गांजा चोरून विकी करणारे आरोपीवर धाड.
बारामती पोलीसांनी दोन किलो 225 ग्रॅम, 53 हजार रूपये किमतीचा गांजा पकडला.
बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मादक पदार्थ गांजा चोरून विकी करणारे आरोपीवर धाड.
बारामती पोलीसांनी दोन किलो 225 ग्रॅम, 53 हजार रूपये किमतीचा गांजा पकडला अशी माहिती मा.उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग श्री नारायण शिरगावकर यांनी दिली.
काल ता.१३/०७/२०२० रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग श्री नारायण शिरगावकर साो,मिळालेले बातमी वरून स्वताः उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक
निरीक्षक औदुबर पाटील, सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे,पोसई पी.आर.गंपले,वाय.ए.शेलारसो.पो.हवा,सातपुते,पो.ना.गोरवे,सिताप.पो.कॉ.गायकवाड,पो.कॉ.पाटील पो.कॉ.लाटणे,पो.कॉ.कुलकर्णी,पो.कॉ.कोकाटे,पो.कॉ.
इंगोले पो.कॉ.राउत,पो.कॉ.उमेश गायकवाड.पो.कॉ.अकबर शेख,म.पो.कॉ.किर्दक,यांनी मा .अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग श्री.मिलींद मोहीते सो, यांचे मार्गदर्शनाखाली बारामती समर्थनगर येथे २०:४५ वा.चे.सुमारास दोन पचं इमस व जप्त मालाचे वजन करण्यासाठी किराणा दुकानदार भारत सुभाष मुथा यांचेसह अचानक
छापा घातला असता सदर ठिकाणी बाई नामे वंदना ऊर्फ वंन्डी बाळु सोनवणे या मिळुन आल्या आरोपीचे घराचे झडती घेतली असता घरातील घरगुती वापराची भांडी ठेवलेल्या खोलीमधील पाणी पिण्याचे कुंभार माठात प्लास्टिकचे पिशवीत गांजा लपवुन ठेवलेला व बेडरूमधील लोखंडी कपाटामध्ये पांढऱ्या कागदी पेपर मध्ये अखंड घटट गुंडाळलेला गांजाचा गटटा मिळुन आला पोलीसांनी अंदाजे ५३,३५०/-रू किंमतीचा २ किलो २६० ग्रॅम मादक पदार्थ गांजा व गांजा भरण्यासाठी लागनाऱ्या प्लॅस्टीकच्या पिशव्या जप्त केल्या असुन पोलीस कॉस्टेबल अकबर शेख यांचे फिर्यादीवरून ता.१३/०७/२०२० रोजी भा.द.वि.कलम ३५३,५०६ सह एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), ii./बी प्रमाणे गुन्हा दाखल.
केला आहे.गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक श्री सचिन शिदे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस अधिक्षक श्री मिलींद मोहीते सो, यांचे मार्गदर्शनाखाली मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो,पोलीस निरीक्षक श्री निरीक्षक औदुबर पाटील,सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे,पो.स.ई.पी.आर.गंपले,वाय.ए.शेलार.सो.पो.हवा.सातपुते,पो.ना.गोरवे,ओकार सिताप पो.कॉ.राजेश गायकवाड,सिध्देश पाटील,पोपट कोकाटे, सुहास लाटणे,योगेश कुलकर्णी, उमेश गायकवाड,दशरथ इंगोले,अजित राउत अकबर शेख,म.पो.कॉ.किर्दक, यांनी केली.