बारामती ११ लाखांचा गुटखा जप्त,शहर पोलिसांची कारवाई
पोलीस उपाधीक्षक यांच्या नेतृत्वात
क्राईम;बारामती वार्तापत्र
दिनांक ०९/०६/२०२२ रोजी पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांनी गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सपोनि. पालवे, सपोनि. वाघमारे, पो.कॉ. चव्हाण ब.नं. २७५०, पो.कॉ. ठोंबरे ब.नं. २००१, पो.कॉ. दळवी ब.नं. १९२६, पो.कॉ. कांबळे ब.नं. १४२७ यांना सोबत घेऊन वसंतनगर येथून टी. सी.कॉलेजकडे जाणारे बाजूकडे साधारण ३०० मिटर पायी चालत जात असताना मिशन हायस्कुलचे शेजारी रोडवर माहिती मिळाल्याप्रमाणे एक अशोक लेलंड टेम्पो क्र MH12 QG 8872 थांबलेला दिसला. पोलीस स्टाफ त्याचे जवळ जाताच त्या टेम्पोमधून संतोष गायकवाड व एक अज्ञात इसम हे दोघेजण मिशन हायस्कुलचे तार कंपाऊंडवरुन उडी मारुन पळू लागल्याने पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग केला त्यावेळी आवाज देवूनही ते अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेले.
पोलिस स्टाफने मिळून आलेल्या अशोक लेंलड टेम्पोची पाहणी केली असता सर्व पिशव्यांमध्ये गुलाम नावाचा गुटखा मिळून आला. मिळून आलेल्या अशोक लेलंड टेम्पोचे व त्याचे आतमध्ये मिळून आलेल्या पांढऱ्या पिशव्यामधील गुलाम गुटख्याचे माहिती खालीलप्रमाणे
एकूण १३,०८,८०० रुपयांचा माल त्यामध्ये ११,०८,८०० रुपयांचा गुलाम गुटखा आणि २,००,००० रुपयांचा अशोक लेलंड टेम्पो
पोलीस नाईक श्री. यशवंत ज्ञानदेव पवार यांनी संतोष गायकवाड व एक अज्ञात इसम यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक, बारामती, श्री.गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सपोनि. पालवे, सपोनि. वाघमारे, पोलीस नाईक यशवंत पवार, पो.कॉ. चव्हाण ब.नं. २७५०, पो.कॉ. ठोंबरे ब.नं. २००१, पो.कॉ. दळवी ब.नं. १९२६, पो.कॉ. कांबळे ब.नं. १४२७ यांनी केली आहे.